आपण खूपच पुढे चालत आलो आहोत।।।
जिथून आपण सुरूवात केली
ते स्थळ आणि तो काळ अनेक प्रकाशवर्षे मागे पडलाय।।।
मार्ग क्रमण करता करता आपणाला
आता सापडत नाही मनात सुद्धा-
ते आपले घर नि आपले गाव।।।
माझ्या ह्रदयाच्या खोल कप्प्यात लपवलेला
सुगंध आणि माझा अफाट बहर-
तेथेच ठेवून निघालो मी लांबच्या
अतर्क्य ठिकाणी- चरितार्थासाठी।।।
मला भिती वाटते की जुने रस्ते आणि
पायाखालच्या गल्ल्या मनःपटलावरून
कालाैघात पुसट होत जातात की काय।।।
त्या सगळ्या आठवणी कायमच्या धूसर होतायत।।।
तो ओलांडलेला उंबरठ्याचा मागमूसही
विस्मरणात जातोय जणू।।।
नवीन रस्ते आणि तरूण गल्ल्या ति-हाईत भासू लागतात।।।
पायाला भिंगरी लावून फिरत राहतो मी सतत।।।
स्थैर्य मिळवण्यासाठी वण वण भटकतो
मी मोठ्या शहरात सर्वत्र।।।
क्षणाची सुद्धा फुरसत मिळत नाही बसण्यासाठी।।।
अनोळखी चेहरे आणि त्यांचे मुखवटे
एकमेकात बेमालूमपणे मिसळलेले वाटतात।।।
मी वेड्यासारखा शोधतो नवीन ठिकाणी
नोकरी, घर, आणि चारापाणी।।।
स्वतःलाच जुन्या मोठ्या झाडागत पाळामुळांसकट
लावतोय मी नवीन मातीत।।।
एक प्रश्न नेहमी सतावत राहतो
जरी फोफावले हे झाड खोल पाळामुळांसकट
बसतील का काही पक्षी त्या झाडावर।।।
जरी बसले पक्षी झाडावर तरी कळेल का कधी
त्यांना माझ्या घरी साठलेला माझा सुगंध-सोहळा।।।
जाणवेल का कधी त्यांना सहज उत्पन्न
झालेला माझा नैसर्गिक बहर।।।
पण हे सुद्धा शोधतोय मी की
मीही रूजेन का येथे खोलवर पसरणा-या
पाळामुळा सकट सक्षम बनून।।।
ही भूमी मला स्वीकारते का अव्हेरते
याची उत्तरे शोधतोय मी नव्यानेच।।।
No comments:
Post a Comment