बदल हा अपरिहार्य असतो हे एकदा
मुळात समजून घेतले की द्वंद्व संपते।।।
आपली खळखळ तो पर्यंतच जो पर्यंत
हेच हवे तेच नको चा अट्टहास आपण करत बसतो।।।
लठ्ठ पगार घरापासून दूर नेवून ठेवतो।।।
नि हुद्यासाठी धडपड आयुष्यात कोतेपणा शिकवते।।।
वेगाची नशा आपल्या श्वासात भिनते।।।
मूल्ये पुस्तकांपुरती सिमीत रहातात।।।
विद्वत्तेची महत्ता काळासोबत वाहून जाते।।।
प्रेमाचे चार शब्द मात्र आयुष्यभर सोबत करतात।।।
शिक्षणाची बिरूदं रोजी रोटी पयॆंत रेंगाळत राहातात।।।
यश हुलकावणी देतं किंवा जग कह्यात घेतं।।।
एकलेपणा आपणाला बंदिस्त करतो।।।
आव्हाने आपल्याला एकटे पाडतात।।।
विचारांची शकले सहज पडून जातात।।।
भावना आणि कृती यांचा ताळमेळ लागत नाही।।।
मायेची पाखरण करणारी लोकं जीवनातून
एकेक कायमची माया पारखी करून निघून जातात।।।
जवळची माणसं दुरावतात नि विश्वाच्या
अपरिचित मितीत सामावतात।।।
कधी निःशब्द होत जातो आपण आणि
जाणवतो रिकामेपणा मुरलेला नसानसांत।।।
कधी आपणही शोधत राहतो मनातील तरलतेत
आपले आणि आपल्यांचे नात्यांचे गोफ
एकमेकात घट्ट विणलेले।।।
आपणाला अवचित क्षणी जाणवतोच
मुठभर नात्यांचा परिचित सुगंध।।।
जो घमघमाट उजळवतो आपले तेजस्वी अस्तित्व।।।
आपणही मार्गस्थ होतो -अनंतकालापर्यंतच्या प्रवासासाठी ।।।
ही नाती अशीही पेरत जातात आठवणीच्या
शिंपल्यात सौख्याचे टपोरमोती।।।
ओघळून पडतात राग, ईर्ष्या आणि द्वेष क्षणार्धात।।।
या इतकी मोदाची दुसरी अवस्था काय असू शकते?
ह्रदयातून पाझरणारे आनंदझरे अनुभवताना
आपणही झेलतो काही निर्मळ तुषारकण।।।
आणि प्रेमाचा लःख्ख प्रकाश परिपूर्ण बनवतो
आपल्याला आत्मिक ज्ञानाने।।।
No comments:
Post a Comment