आयुष्य म्हणजे- जणू एका अथांग जलाशयातील
झिळमिळणाऱ्या सोनसळी तरंगाचे प्रक्षेप.
तर कधी वाहत्या झऱ्याचे सतत प्रवाहीपण.
आयुष्य म्हणजे-कधी अवर्णनिय आभाळाची अनंत निळाई.
तर कधी बेफाम वाऱ्याचा बेछूट बेदरकारपणा.
आयुष्य म्हणजे- कधी अफाट सागराची अभूतपूर्व सखोल
व्यापकता.
तर कधी सफेद बर्फाच्छादित हिमालयाची उत्तुंग शिखरे सर
करणारे अमानवी धैर्य.
आयुष्य म्हणजे- सूर्यकिरणांनी पुलकित झालेल्या
धरणीमातेचा उत्सव.
तर कधी शीतल चंद्राचे अजर तेज ल्यालेल्या मातृभूमीचा
अपार गौरव.
आयुष्य म्हणजे तरलता,सिद्धता,नि सौंदर्याची परिसीमा.
तर कधी सामर्थ्य,सहिष्णुता ,संस्कृती यांची सरमिसळ.
आयुष्य म्हणजे -कधी जीवनाच्या परिपूर्णतेचा अखंड स्त्रोत.
तर कधी मृत्यूलाही कवटाळणाऱ्या अभेद्य इच्छाशक्तीचे
अवध्य प्रकटीकरण.
PC:Facebook, Google images
No comments:
Post a Comment