Friday, December 15, 2023

मैत्री म्हणजे ....

मैत्री म्हणजे निरभ्र आकाश,

तर कधी मध्यरात्रीचा चंद्र-प्रकाश.


मैत्री म्हणजे खांद्यावर डोकं ठेवून दिलेला हुंदका,

तर कधी दिलेला उभारीचा शब्द.


मैत्री म्हणजे जाणवणारा रितेपणा,

तर कधी दूर जाताना वाटणारी हुरहूर.


मैत्री म्हणजे भर पावसात- वाफाळलेला चहा नि भजी,

तर कधी रिमझिम पावसात- मनसोक्त भटकंती.


मैत्री म्हणजे प्राजक्ताच्या फुलांचा पहाट-सडा,

तर कधी निशिगंधाचा सुगंध वा रातराणीचा बहर.


मैत्री म्हणजे एक आश्वासक नातं आपोआप जुळलेलं,

कळलेलं वाटणारं पण खरं तर न कळलेलं...

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...