सर्वत्र विचरण करताना जाणवत राहतो
आजूबाजूचा कोलाहल आसमंतात घुमणारा!!!
कधी आपल्याला त्याच्या कह्यात घेणारा
तर कधी अवचित आपल्या स्वनिर्मित कक्षा ओलांडणारा!!!
आकाशातील अवकाश शोधत राहतो
स्वतःचे मूर्त रूप अव्याहतपणे!!!
तर धारित्रीच्या कुशीत विविध प्रकारच्या
अतिंद्रिय क्षमता विकसत राहतात सतत !!!
मानवी जडणघडणीवर मात करत निसर्ग कधी
आपल्या असीम धैर्याचे प्रकटीकरण करतो!!!
तरी जीवनाची भव्य नदी मजल दरमजल करत मार्गक्रमण
करते - सुरूवात, मध्य, शेवट याची तमा न बाळगता!!!
शांततेत मिसळत जातात वर्तमान क्षण
नावीन्याची ओंजळ भरत!!!
तरी त्यांचा न परतणारा प्रवास अस्वस्थ करतो
भूतकाळात समर्पित होताना!!!
निर्माण, सृजन, रचना, स्वभाव, संकल्प, प्रयत्न
यांनी प्रकटणारे जीवन-स्वप्न बनते एक
न थांबणारा सत्य-प्रवाह।।।
भविष्य काळ अव्यक्तच राहतो
अनंत अपेक्षांचे ओझे बाळगत।!!!
तरीही आयुष्यात फेर धरून नाचत थिरकत
गिरक्या घेत राहते निर्मोही स्वप्न
नित्य सत्यात परिवर्तित होत!!!
No comments:
Post a Comment