Thursday, December 14, 2023

मानवजातीच्या उत्थानासाठी।।।




सतत मार्गक्रमण करत 

राहणे हेच श्रेयस्कर।।। 

बरेचदा आपण रेंगाळतो 

ठराविक क्षणिक सुखासाठी।।। 


हे क्षण भूतकाळात सामावले की 

आपण आठवणींभोवती पिंगा घालत बसतो।।। 

वर्तमानात घोळवत राहतो विचार मिळवलेल्या

यश-अपयशा बद्दलच्या निमित्तांचा।।। 


आपण पक्क्या सत्यगाठींच्याभोवती 

आठवण-रेशीमाची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो।।।

तरीही वियोगाचे खोल गर्तेत 

रूतणारे दुःख  वाढतच जाते।।। 


बदलती समीकरणे जुन्या नात्यांत 

नव्याने गुंफली जातात।।। 

काही नाती काळाच्या भोवऱ्यात विलीन होतात।।। 


आपण गोळा करतो भिरकावलेल्या  काळाच्या विविध 

तुकड्यांना हतबुद्धपणे।।। 

आणि त्यातून अर्थपूर्ण जीवन 

निर्मिण्याचा स्तुत्य प्रयत्न करतो।।। 


न बदलता येणाऱ्या नानाविध घटना 

आपण नाईलाजाने स्विकारतो।।। 

आणि अशा आपल्या मर्यादित 

प्रक्षेपाचा मागोवा घेणे ह्यालाच जीवन म्हणतो।।। 


कधी तोडणार आपण या 

आत्मकेंद्रित चौकटी? 

कशा ओलांडणार आपण 

या स्वनिर्मित कक्षा? 


कधी छोट्या मोठ्या तडजोडी करण्यात 

आपले आयुष्य तडजोड बनते तेच कळतंच नाही।।। 

आपण चालत राहतो तरीही 

खडतर मार्गावर तक्रार न करता।। 


त्यातच इतरांनी दिलेले आशीर्वाद 

बरसतात कधी-मधी पावसाच्या सरींप्रमाणे।।। 

'पेरलेलेच उगवते' या उक्ती नुसार आपलाही बहर भविष्य 

काळात ठरलेला नक्कीच।।। 


म्हणून आपण स्विकारावे स्वातंत्र्य आणि उत्तमता।।। 

शेवट गोड तर सर्वच गोड।।। 

त्यातच अंगी बाणवावी श्रेष्ठता नि सद्गुण।।। 

व्हावे कणखर आणि उदात्त मानवजातीच्या उत्थानासाठी।।। 


PC:Google images

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...