बदल अपरिहार्य असला तरी
तो नेहमीच वाईट नसतो।।।
याची जाणीव आपणाला
अधिक समृद्ध करते।।
आपण मात्र बरेचदा जुन्या विरून गेलेल्या आभासचक्रात
स्वत:चा धांडोळा घेऊ पाहतो।।।
वर्तमानवर भूतकाळ आरोपित करण्यात धन्यता मानतो।।।
पण वर्तमान हिच बदलाची नांदी असते।।।
काही क्षण असेही येतात अवचित-
जसे पाखराने निरपेक्षपणे कणसाचे टपोरमोती वेचावे नि
त्याची जन्मभराची भूक भागावी।।।
तशी जीवनात भरभरून अनंत आनंदाची प्राप्ती होते।।।
समग्र अपूर्णतेला आपण जेव्हा जसेच्या तसे
स्विकारतो तेव्हाआपण नवीन आयामात प्रवेश करतो।।
संपूर्ण स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
या अखंड अनुसंधानानेच होते।
आपली सहज कृती नैसर्गिक क्षमतांच्या
विकासाला कारणीभूत ठरते।।।
त्यात आपल्याला सातत्य लाभले की वाटचाल करता करता
कधी आपणाला आपले ईप्सित साध्य झाले ते कळतच
नाही।।।
No comments:
Post a Comment