Friday, December 15, 2023

दिवाळी म्हणजे...


दिवाळी म्हणजे पणत्या दारी लावता लावता

आपले -हृदय ओतप्राेत प्रेम-प्रकाशाने उजळवणारा उत्सव।।।


दिवाळी म्हणजे आनंद नि समाधान, वात्सल्य नि प्रेम, 

परंपरा नि नावीन्य यांचा मिलाफ साधणारा सण।।।


दिवाळी म्हणजे प्रकाश उधाणणारा आणि आपुलकी 

जपण्यासाठी भरघोस संधी देणारा विरळ-क्षण।।।


दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटता भेटता मनाचा 

प्रत्येक कानाकोपरा प्रफुल्लित करत पुन्हा पुन्हा आठवणी 

जोपासण्यासाठीचे निमित्त।।।


दिवाळी म्हणजे फटाके उडवताना, फराळाची मेजवानी 

अनुभवताना लहानथाेरांनी नात्यांना दिलेला अर्थ।।।


दिवाळी म्हणजे वसुबारसेचे वात्सल्य, धनत्रयोदशीची 

अर्थपूर्णता नि मांगल्य, नरकचतुर्दशीची शुचिर्भूतता ,

लक्ष्मी पूजनाची संपन्नता, पाडव्याची प्रसन्नता नि भाऊ 

बीजेची प्रेमळ उन्नतता।।।


दिवाळी म्हणजे जीवनाची सर्वोत्तम सृजनशीलता नि

आयुष्याच्या नवनिर्मितीच्या चढत्या आलेखाचा शुभारंभ।।।


दिवाळी म्हणजे जिव्हाळा, सौहार्द आणि 

भव्यतेचे आगळे वेगळे प्रकटीकरण।।।


दिवाळी म्हणजे आपणच जोखलेले 

नि आपणच निर्मिलेले आपलेच

लखलखणारे तेजःपुंज अस्तित्व।।।

 

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...