वळणा वळणावर मागोवा घेत
आपण पुढे पुढे चालत राहतो।।।
कधी आपला मार्ग क्लिष्ट तर
कधी राजमार्ग असतो।।।
जेव्हा आपण सोडतो उसासे
तेव्हा ह्रदयावर कोरला जातो इतिहास।।।
भूतकाळाची ओझी निमूटपणे
ओढताना आपली खूपच फरफट होते।।।
तेव्हा आपल्याला जाणवते
आपल्या अंतरतमातली तीव्र वेदना।।।
नि पोकळ सांत्वनाचे बुडबुडे
कधीच भरू शकत नाही खोल जखमा।।।
रुतलेली वाक्यं मनाला चिरत
अंतरात घर करून राहतात।।।
नि आयुष्यभर वाहिलेल्या चिंता हळूहळू
कपाळावर आठ्या निर्मित करतात।।।
दुःख आपल्या पाचवीला पुजलेले असते।।।
अस्वस्थता विस्तारत जाते।।।
बहराच्या दिवसांतल्या आठवणी डाचू लागतात।।।
संपत चाललेलं प्रत्येकाचं आयुष्य जगण्यावर
प्रश्नचिन्ह निर्माण करते।।।
विविध प्रकारच्या असतात व्यक्त अथवा अव्यक्त व्यथा।।।
काही प्रकटतात आवेगाने तर काही राहतात सुप्त।।।
तरी भावनांना मोकळी वाट हवी असते।।।
आणि बंदिस्त विचारांना हवी असते मुक्तता
शरीराच्या मीपणाच्या पिंजऱ्यातून कायमची ।।।
No comments:
Post a Comment