Thursday, December 14, 2023

अंतिम टप्पा



अवचितपणे अंधारातून प्रकाशाकडे 

अव्याहतपणे पाऊलं टाकताना

कधी आपण प्रकाशमय सहस्रसूर्याच्या 

दालनात दाखल होतो आपणच जोखू शकत नाहीत।।। 


सदगुण जोपासताना अनपेक्षितपणे आपण

जीवनाच्या सकारात्मक पैलूंकडे 

आपोआप खेचले जातो।।। 

तीच बनते आपली स्वत:च्या 

निर्माण कार्याची पायाभरणी।।। 


अडचणी नि आव्हाने 

क्षुल्लक भासू लागतात।।। 

आकर्षणे नि प्रलोभने 

क्षीण होत जातात।।।


विविध प्रकारच्या घटना जीवनाची वीण 

अधिकाधिक प्रगल्भ बनवतात।।। 

धडपडत पुन्हा एकदा नव्याने आपण निर्मितो 

आपले ध्येयवादी कृतीशील अस्तित्व।।। 


सहजी सुटावे कोडे असे नसते आयुष्याचे प्रमेय।।। 

क्षणभरात पडतात फासे कधी अनपेक्षित 

तर कधी हवे त्याहून उत्तम।।। 


कळत नाही रस्त्यांचा लांबच लांब विस्तार।।।

तरीही बदलाला सामोरे जात आपण गाठतो अत्युच्च ध्येय ।।। 

कारण मूल्यांची योग्य दिशा नेवून ठेवते अचूकपणे इप्सित 

ठिकाणच्या अंतिम गंतव्यापर्यंत।।। 


जाणवतात विविध शक्यतांचे प्रक्षेप नि लुप्त होतात

उपाध्यांच्या सावल्या।।। 

मात्र खुणावतो पैलतीर तेव्हा सारे जग लोप पावते।।। 

मग आपण ही मार्गस्थ होतो वेदनेचा अंतिम टप्पा

ओलांडत कायमचे।।।

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...