गुरू देतो जगण्याला दिशा॥
गुरू पल्लवीत करतो जीवन- आशा॥
गुरू प्रदान करतो प्रत्यक्ष ज्ञान॥
गुरू देतो जगण्याचे भान॥
गुरू तोडतो अहंकाराचे पाश॥
गुरू करतो असत्याचा नाश॥
गुरू संहारतो अमानुष हिंसा॥
गुरू अंगिकारतो निस्सीम अहिंसा॥
गुरू असतो अमर्याद आकाश॥
गुरू असतो वैश्विक अवकाश॥
गुरू असतो ऊन्हात सावली॥
गुरू जणू साक्षात माऊली॥
गुरू म्हणजे अनंत ब्रह्मानंद॥
गुरू प्रकटवतो अक्षय्य आत्मानंद॥
गुरू तोडतो अज्ञानाचे मूळ॥
गुरू आहे आनंदघन समूळ॥
गुरू तारतो संसार-सागर॥
गुरू आहे प्रेमाचं आगर॥
गुरू ओलांडतो दु:खाची सीमा॥
गुरू म्हणजे निस्वार्थाची परिसीमा॥
गुरू प्रत्येकाला दावतो उन्नत वाट॥
गुरू म्हणजे अथांग करूणेचा पाट॥
गुरूला करावे प्रथम वंदन॥
साष्टांगाने मी करतो नमन॥
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा प्रत्येकातील गुरूतत्वाला प्रणाम....
No comments:
Post a Comment