Thursday, December 14, 2023

जीवन-शिल्प!!!



काही क्षण अवचित वेचायचे असतात।।। 

ह्रदयात खोल कप्प्यात साठवायचे असतात।।। 

तर काही क्षण मात्र जोखायचे असतात।।। 

आपल्यांचे आपलेपण ओळखायचे असतात।।। 


कधी आपण जगण्याचा आलेख उंचवायचा असतो।।। 

उन्नत जीवन प्रत्यक्षात उतरवायचे असते।।। 

वाट कापता कापता आपणही इतरांना साथ द्यायची असते।। 

दुःखाने कातर होत असतानाही सुख वाटावयाचे असते।।। 


आपण बरेचदा भरकटतो अचानकच।।। 

तेव्हा पुन्हा पुन्हा योग्य मार्गावर यायचे असते।।। 

इतर लोक आपणांस दोष देत बसतात।।। 

तेव्हा हळूच त्यांना माफ करून तेथून सहज निसटायचे 

असते।।। 


बरेचदा जाणवते घोळक्यातले आपले अस्तित्व 

शून्य होत असते।।। 

तेव्हा एकट्याने आपलीही पायवाट आपणच बनवायची 

असते।।। 

सारे मित्र कित्येकदा फितूर होतात।।। 

तेव्हा एकटेच फुलण्याची हिंमत बांधायची असते।।।


सर्वत्र आजूबाजूच्या वातावरणात मृत्यूचे तांडव चालू असते।।।

तेव्हा जीवन मूल्यांवरची अढळ श्रद्धा अधिक प्रगाढ करायची 

असते।। 

भरपूर मेहनत घेत उच्च, उच्चतर आणि उच्चतम स्तरांना एका 

मागोमाग एक कवटाळायचे असते।।। 

विविध प्रकारची आव्हाने पेलताना अधिकाधिक धैर्यवान 

बनायचे असते।।। 


स्वतःच स्वतःमधले गुण दोष उलगडत उत्कृष्ट दर्जाचे आयुष्य 

व्यतीत करायचे असते।।। 

अथकपणे कार्यरत असताना पुरुषार्थाचा निग्रह करायचा 

असतो।।। 


सारं जग जेव्हा केव्हा विरोधात उभे ठाकते ।।।

तेव्हा स्वतः च्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर 

शिक्कामोर्तब करायचे असते।।। 


उत्तुंगाला सहज कवेत घ्यायचे असते।।। 

असीम ताकद अंगी बाणवत अंतिमतेपूर्वी

आपणातील स्वत्व शोधायचे असते।।। 


आपल्या अनंत, अद्वितीय नि अनादि अशा हिमतीवर  ईप्सित 

ध्येय साध्य करायचे असते।।। 

अवध्य, अजर आणि अजेय बनत आपणच आपले जीवन-

शिल्प प्रत्यक्षात साकार करायचे असते।।। 


PC: Google Images, Facebook

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...