सर्वत्र एकदम प्रगाढ शांतता आहे.
मी एकामागून एक क्षण निवडतो.
नी काळ-मोत्यांचा एक अप्रतिम
चमकणारा हार बनवतो.
हा काळाचा तेजस्वी आणि चमकदार
अलंकार मी तुझ्या गळ्याभोवती घालतो, आई!
मी तुझ्या मंगल चरणी मस्तक ठेवतो.
तुझ्या सर्व प्रेम, भावना आणि आपुलकीच्या
महापूरांनी माझे आनंदाचे अश्रू
माझ्या गालावर हळू हळू ओघळतात.
तुझे अगणित आशीर्वादच जणू
माझी अगाध श्रीमंती आहेत.
तू पावित्र्याचे मूर्त स्वरूप आहेस.
तुझ्या अंतःकरणातील तुझी असीम
शांतता हाच माझा खजिना आहे.
काय आश्चर्य आहे! तो माझे हृदयही उजळवतो.
नि त्याचे धडधडणारे ठोके सर्वत्र वैभव पसरवते.
मी तुझ्या औदार्याने तुझ्या मनाच्या
सौंदर्याची चमक पाहतो.
माझे हृदय तुझ्या सूर्यप्रकाशाने ओथंबून जाते.
आई! तुझ्या सौम्यतेची नि सौहार्दाची मी पूजा करतो.
माझ्या अपूर्णतेवर तू तुझ्या
अनंत प्रेमाचा वर्षाव करतेस.
मी तुझ्या अथांग सह्यदयतेची आराधना करतो
नि तुझ्या सामर्थ्याची आणि निःस्वार्थतेची प्रशंसा करतो.
प्रिय आई, तुझ्या पवित्रतेचे अमर्याद
अमृत मी प्राशन करतो.
तेच मला माझ्या हृदयकेंद्रात
प्रसन्न नि समाधानी करते.
No comments:
Post a Comment