आपण जेव्हा जाणतो जगण्याचे रहस्य
उलगडत जातात आयुष्यातील घटनांचे संदर्भपट।।।
अनेक वळणांचा प्रवास सुरूच राहतो
नानाविध आकांक्षांचे प्रकटीकरण करत नव्यानेच।।।
आपल्याच मनकंगोऱ्यांचा सतत मागोवा घेत
सुरूच राहतो जीवन ध्येयासाठीचा निरंतर ध्यास।।।
पडतातच ओंजळीत काही उजळणारे क्षण-मोती अवचित पणे।।।
तेच असतात प्रकाश-बोध मनाचा आसमंत उल्हासित करणारे।।।
अनपेक्षितपणे आपल्या मनोकाशात
सुरूच राहतो जीवनघटनांच्या ऊन-पाऊसाचा लपंडाव।।।
हृदयात वाहत राहतो उसळणारा सात्त्विक-प्रकाश प्रवाह।।।
शुद्ध-गंगेच्या तेजस्वी तुडुंब पात्रागत विस्तारलेला स्वयंभू।।।
कदाचित आपणही न्हाऊन निघतो अंतर्बाह्य
त्या ऊर्जा स्त्रोतात अनाहूतपणे।।।
जाणवत राहतो आपल्याला आपलाच विराट नि भव्य विस्तार।।।
आपले खुजेपण नाहीसे होते सहजपणे।।।
नि आपण कवटाळतो क्षितिजापलिकडचा
आपलाच अतर्क्य स्वनिर्माण।।।
त्यातून जाणवतो मनातील सहस्त्रसूर्याचा
बेफाम नि वेगवान भासणारा तरी दैदिप्यमान उद्गम।।।
आणि प्रकटते आपलेच निश्चल, निडर नि निष्कलंक
अस्तित्व।।।
आपणही स्वतःच स्तिमित होतो स्वतः च्या
निरपेक्ष नि निरलस जीवनप्रभेने।।।
निर्मित होते अवैयक्तिक,अनपेक्षित नि दुर्मिळ पूर्णत्व,
असे क्वचितच घडते मानव इतिहासात।।।
No comments:
Post a Comment