वाटतं आपण सुद्धा आपल्या आयुष्याचा
सांगोपांग विचार करायलाच हवा।।।
झुकण्याची कला आपणही आत्मसात करावी।।।
पण दुबळे वाटता कामा नये हेच खरे।।।
कधी आपणही चुकतोच की आणि
आपण हे मान्य करण्यात काही वावगे नसते।।।
पण आपण नेहमीच चूक असतो
हे ही नसते खरे हे आपले आपणच जोखावे कधीतरी।।।
आपणात नम्रता आणि ऋजुता असावी ।।।
पण आत्मकेंद्रीपणा आणि आढ्यताखोरपणा नसावा।।।
तरी आपण नाही तयार होत मान्य करायला।।।
की स्वकेंद्रित बुद्धी पेक्षाही साधेपणा श्रेयस्कर।।।
जीवन म्हणजे काही गंमत नव्हे।।।
जन्मभर प्रेमाच्या शेकडो शपथा घ्यायच्या
आणि बरेच पुढे आल्यावर
साथ सोडण्याच्या गोष्टी करायच्या।।।
कधी मागे वळून पाहताना
आयुष्यातील असंख्य पराभव नि
न भरून निघणाऱ्या वेदनादायक
जखमा प्रकर्षाने आठवतीलही।।।
तेव्हाच कस लागतो आपल्या या
तथाकथित नात्यांच्या पक्केपणाचा।।।
आपणास हताश करेलच भविष्यात मांडून ठेवलेले
हळूहळू अनाहूतपणे येणारे भितीदायक एकलेपण।।।
विशिष्ट काळ चालत बरेच पुढे आल्यावर
फसव्या शरीराच्या अनंत पणाची भ्रामक समजूत
गळून पडली की जाणवत राहतील आपल्याला
आपल्यासाठी इतरांनी केलेला असीम त्याग ते नसताना।।।
आठवेल त्यांनी मूकपणे आपल्यासाठी साहिलेल्या
ह्रदयावर गोंदवलेल्या वेदनांच्या नोंदी।।।
मग आठवतील कदाचित आपणच स्वतः त्यांच्या
मनावर केलेले अगणित क्रुद्ध प्रहार।।।
एवढे सहन करूनही त्यांनी न उच्चारलेला ब्र
बनवत जाईल आपल्याला प्रगल्भ नि अंतर्मुख।।।
पण न जाणो तेव्हा फार उशीर झालेला असू शकतो
आपला पश्चातापाचा टाहो त्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी।।।
कारण अनंताच्या प्रवासाची प्रत्येकाची वाटचाल सुरू
झालीये।।।
वेळीच सावध होत, आला भरभरून जगतानाही भविष्यात रुखरुख लागणे टाळायचे असेल तर ही कविता खूप काही सांगून जाते. मस्तच!
ReplyDelete