माणसं शिल्लक राहतात -
मनामनांत, मुक्त विचारात, लेखकांच्या पुस्तकांत
आणि निर्व्याज ह्रदयात।
माणसं शिल्लक राहतात -
फुलांच्या सुगंधात, पाऊस सरींच्या कोसळण्यात,
वा-याच्या मंद झुळूकांमधून, चंद्राच्या शीतलतेत,
सूर्याच्या सहस्र रश्मींमध्ये, तारुण्याच्या ऊर्जेमध्ये,
जगण्याच्या जिद्दीमध्ये।
माणसं शिल्लक राहतात -
कधी फुलाच्या कोमेजण्यात, पिकल्या पानाच्या गळण्यात,
शेतातील कोरडया ढेकळांमधे, वादळाच्या दिशाहिनतेत,
अमावस्येच्या अंधःकारात, सूर्यास्ताच्या व्याकूळतेत।।।
तरी माणसं शिल्लक राहतात -
आपल्या डोळ्यांतील चमकेमध्ये।।।
शेवटपर्यंत।।।
No comments:
Post a Comment