वाहत्या स्मरणाच्या सुखद झुळूकांवर स्वार होत येतात
भूतकाळातील गंधाळलेल्या चिंब अजर स्मृती!
आयुष्याच्या विविध अलौकीक हृद्य आठवांने उजळतात
हृदयाचे कानेकोपरे लख्खपणे!
कधी जाणवतो प्रदीर्घ प्रवासातला एखादाच अल्हाददायी
ओढाळ मुक्त क्षण!
आनंदाचे भरते होऊन येणारा अजाणतेपणे !
हे सारे दुर्मिळ क्षण मी गोळा करतो!
असे प्रकाश मोती साठवतो मनाच्या टपोर-शिंपल्यात!
मी वेध घेतो सातत्याने वर्तमानातील अधीर उज्वल
क्षणवैभवाचा!
जो ओढून काढतो आपल्याला नकारात्मक विचार शृंखलेतून
कायमचा!
नि अमर्याद मनाच्या आकाशातील सकारात्मक ऊर्जेमध्ये
वाहत नेतो सतत !
प्रखर सूर्याच्या अभूतपूर्व सहस्त्ररश्मीमध्ये न्हाऊन निघतो
आंतरिक गाभा!
मिळतोच विसावणारा प्रहर अतीव कोलाहलातही!
मार्ग मोकळे होत जातात सहजतेने अनेक योजने!
अनपेक्षितपणे प्रगाढ शांतता विस्तारत जाते माझ्या
हृदयापासून ते सृष्टीच्या अंतरतम कणाकणात रुजणारी!
तेव्हापासून अधरपणे जणू सारी समष्टिच गोंदवून घेते
अ-क्षर आनंद पृथ्वीच्या विराट देहावर अखंडपणे!
PC: Google Images!!!
No comments:
Post a Comment