Thursday, December 14, 2023

प्राप्त प्रवास।।।



आयुष्य म्हणजे येरझा-या।

मोजके श्वास मिळालेले ।।। 

उश्वासानंतर परत न सापडणारे।

कधी पुन्हा मिळत परत हरवणारे।।। 


प्रत्येकाला आभास आहे। 

आपण उद्या असणार नक्की।।। 

जरी सुख दुःख नसातून वाहते सतत। 

तरी कायमचे वास्तव्य नसणार ही गोष्ट पक्की।।। 


छोट्या छोट्या घटना प्रभाव टाकणा-या। 

आपण त्याची मोळी बांधून चालू लागायचे।।। 

क्वचित प्रसंगी मोठा आनंदही मनमुराद लुटायचा। 

आपल्या मनातील ह्रद्य आठवणी मनातच साठवायच्या।।। 


आनंद, समाधान नि प्रेम हा काही शाब्दिक खेळ नव्हे।

जगण्याची रीत नि आयुष्याची नीव आहे ती।।। 

निर्मळ नि निर्व्याज जीवन जगत अनंतात लुप्त व्हायचे।

मागे वळून नाही पहायचे नि कशातच नाही गुंतायचे।।। 


मी, माझे यांना आपण नि आपले बनवायचे। 

ह्रदयातील प्रेमसागराला ओसंडून वाहू द्यायचे।।। 

देण्यातला प्रमोद अमर्याद असतो। 

मागण्यातील क्षुद्रतेला तिलांजली द्यायची।।। 


आलेच डोळ्यात अश्रू तरी लगेच पापण्या पुसून घ्यायच्या।

दुःखाचे कढ जीरवत पुन्हा पुन्हा आनंद प्रकटू द्यायचा।।। 

कधी वाटलाच थकवा तर थोडासा विसावा घ्यायचा।

ठरलेल्या श्वासातून जीवनाचा अर्थ शोधायचा।।। 


मनातल्या गलबलीला खोल मनात दडू द्यायचे।

मात्र ओठांवर हसू अवचितपणे रेंगाळू द्यायचे।।।

आपण एखाद्या उन्नत क्षणी सर्व काही डोळे भरून पाहून 

घ्यायचे। 

नंतर कशाचीही इच्छा न ठेवता प्राप्त प्रवासाला

तृप्तपणे निघून जायचे।।।


PC: Pinterest!!!

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...