Thursday, December 14, 2023

जीवनपूर्ती


बाह्य जगाशी आपण नाते कसे जोडतो

हे अंतर्मनाचा मागोवा घेताना उमगते।।।

आपली वैचारिक बैठक किती प्रगल्भ आहे

यावर आपली संवाद नि कृती आधारित असतात।।। 

 

निर्णय क्षमता उच्च कोटीची ठेवली की आपण दूरच्या 

ध्येयाचा पल्ला गाठण्यासही सक्षम होतो।।। 

मग आपण किती प्रभावी आहोत तेही काळाच्या

प्रतलावर कोरले जाते ।।।


शिकतो आपण विरोधासाठी विरोध करणाऱ्यांकडे 

कानाडोळा करायला ।।। 

चिकाटी नि सातत्य आव्हाने पेलण्यासाठी

उपयुक्त ठरतात।।।


अंधाराची स्थिती कायमस्वरूपी नसतेच मुळी।।। 

आंतरिक प्रेरणा बाह्य तुफानाला भेदून टाकतात।।।

कधी निसटत्या क्षणांवर विजय मिळवताना आपलीच 

ताकद पणाला लावावी लागते।।। 

तर कठीण प्रसंगी अंगी सात हत्तींचे बळ आणले की 

हिंमत आणि धैर्य अंगात संचारते।।। 


सरलेले आयुष्य उरलेल्या क्षणांवर प्रश्नचिन्ह उमटवते।।। 

हरलेल्या बाजीवर पुन्हा डाव लावणे जिकिरीचे होते।।। 

उधळलेले काही क्षण टोचणी लावून जातात।।। 

नि ह्रदयात सळसळणारी वेदना खोलवर रूतते।।। 


आपल्या जवळच्या व्यक्तीकडे खोलवरचा सल व्यक्त 

केला की मनाचे दुःख हलके होते।।। 

मूकपणे सोसणे मनात माणुसकी निर्माण करते।।। 


दुर्जनांच्या नानाविध क्लुप्त्या व्यर्थ ठरतात।।।     

सज्जनांचे आशीर्वचन जीवनदायी ठरतात।।। 

घराचे चीरे ढासळताना होणाऱ्या यातनांनी मनात

तीव्र कळ खोलवर उमटते।।। 

घरांचे सांधे बळकट असतात तेव्हा आनंद गगनाला भिडतो।।। 


भारलेल्या क्षणांवर आरूढ झालो की जगातील सारी सुखं 

ओंजळ भरून टाकतात।।। 

देण्याची कला जमली की आपण पूर्णत्वास पोचतो।।। 

जीवनपूर्ती चे क्षण दुर्मिळ असतात।।। 

समाधानाचे पर्व आयुष्याला नवा अर्थ देतात।।।

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...