मार्ग लांबच लांब आणि दूरपर्यंत पसरलेला।।।
काळाचं ओबडधोबड गणित सहजी न सुटणारं।।।
विविध साधनांचा तुटवडा सर्वत्र भासणारा।।।
तरी धमन्यांमधील रक्त वाहणारे सातत्याने-
उसळणारं चैतन्य बनून।।।
मात्र परत परत आयुष्याच्या भूतकाळात डोकावयाचे नसते।।।
पुन्हा पुन्हा जीवनाच्या दूरभविष्याचा सातत्याने मागोवा
घ्यायचा नसतो क्लिष्टपणे।।।
पण जगण्याची मुभा वर्तमानात पूर्णार्थानं मिळवायची
असते।।।
आपणच आपल्याला जोखायचे असते हे पक्के।।।
पण इतरांच्या माेजपट्टीने स्वतः च्या क्षमता जाणायच्या
नसतात।।।
आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता आहे की उतरता
हे स्वतः पुरते समजून घेणे गरजेचे असते।।।
त्याचा अभिमान बाळगणे वा बाऊ करणे टाळणे हेच
शहाणपणाचे प्रथम लक्षण आहे।।।
कधी प्रवासात चढ तर कधी उतार येणारच।।।
कधी सरळ मार्ग तर कधी खडतर आव्हानं येणारच।।।
तर कधी सुखाचे क्षण झेलावेत वा दुःखाशी दोन हात करावे
लागणारच।।।
कधी ह्रदयातील काही कप्पे कायमचेच बंद करून टाकावे
लागणारच।।।
आपण डोळे उघडून जगणे कधी शिकणार कोण जाणे।।।
आपण डोळे मिटून जाण्यापूर्वी आख्खं उन्नत जग मनाेकाशात
कसे काय साठवून ठेवणार?
आपण तरलतेनं जगताना आवेगाने आपले डोळे कधी
पाणवणार माहिती नाही।।।
आपण अन्यायावर आसूड ओढण्यासाठी डोळ्यांच्या
अंगाराचा वचक कधी बसवणार माहिती नाही।।।
या क्षणात मांगल्य शोधावं।।।
आजच्या दिवशी आनंदयात्री बनून जगावं।।।
ध्येयवेडे बनून झोकून द्यावं आपणाला।।।
स्थळ, काळ आणि वेळांची चौकट मोडून टाकावी धैर्याने।।।
विस्तारावं जीवन काल परत्वे।।।
रचावी स्वप्ने, मेहनत करावी सत्यात आणण्यासाठी।।।
जिंकावी ह्रदये अनेकांची।।।
शोधावे स्वत्व माणसांच्या गर्दीत असूनही।।।
उधळावे काळाचे तुकडे दशदिशांना।।।
चालावे अथकपणे ध्येयाचा दिशेने ।।।
भेदावे निरनिराळ्या प्रकारच्या आव्हानांच्या चित्र बिंदूना।।।
तीक्ष्ण बाणाने घ्यावा वेध केंद्राचा कौशल्याने।।।
साक्षेपाने छेदावे दिर्घसूत्री योजनांचे प्रगटन।।।
ध्यास नि सातत्य यांना बनवावे अस्त्र।।।
न जाणे कधीही संपू शकतील मिळालेले श्वासोच्छ्वास।।।
अथवा कदाचित गाठूही शकतो आपण आपले
ध्येय शिखर तत्पूर्वी।।।
No comments:
Post a Comment