किती काळ पोटापाण्यासाठीच्या खटाटोपीचा।।।
आपण जगण्याची ऊर्मीच हरवून बसतो।।।
श्वास घेण्यासाठी फुरसत नाही।।।
आपल्यांसाठी द्यायला वेळ नाही।।।
मनात वादळं चालू राहतात।।।
छोट्या जीवनात अतोनात कष्ट करायची क्षमता
विकसित करावीच लागते।।।
पैसा कि समाधान याची समांतर भूमिका समजून घ्यावी लागते।।।
रक्ताची नाती कि मैत्री यांचा
लेखा जोखा करणे कठीण जाते।।।
स्वार्थकेंद्रीत जगत राहण्याचा फोलपणा आपल्याला
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही बरेचदा।।।
जुन्या रूसव्या फुगव्याच्या जाडजूड भिंती
नात्यात उभारून आपण नकारात्मकतेच्या
चौकटीत बंदिस्त करतो स्वतः ला।।।
कधीही आपणांस असमाधानाची
कक्षा आेलांडता येत नाही।।।
पार नाही करू शकत आपण
रागाच्या परिसीमा कायमस्वरूपी।।।
होत नाही आपल्या कडून कोतेपणाचा बीमोड।।।
नाही करता येत एक घाव दोन तुकडे आपल्या अहंकाराचे।।।
बुद्धी मधील जाळे जळमटं साफ
करण्याची हिंमत आपण नाही करत कधीही।।।
स्वतः मधले दोष नाहीच उमजत कधीच
आपले आपल्यालाच - नकळत जगाकडे बोट दाखवताना।।।
जसा कांद्याच्या परती मागून परत
उतरवताना गाभ्याशी राहतोच केवळ अवकाश।।।
तसेच बहरु शकते अनंतात
प्रकटणारे शुन्यत्व ह्रदयाच्या केंद्रात।।।
नी जाणवतो तोच होता आपला बहर।।।
ज्याला प्रगट करण्या ऐवजी आपण
कोंडून ठेवला 'मी' पणात अनपेक्षितपणे।।।
आणि जेव्हा आत्मकेंद्रित असण्याचा
अभिशाप आपण पुसतो प्रथमच।।।
तेव्हा आपण मुक्तीकडे वाटचाल करू लागतो।।।
आपणाला अचानक सापडतो आपल्यातल्याच
अंतरतमातील अवकाश ।।।
स्वपणा पलिकडला- परिपूर्ण नि स्वतंत्र –
कदाचित अंतिमतेपूर्वी का होईना।।।
No comments:
Post a Comment